Last Updated: Wednesday, July 4, 2012, 23:38
www.24taas.com, रवींद्र कांबळे, सांगलीसांगलीतल्या वेश्या वस्तीतील मुलांसाठी राज्य सरकारनं पहिली आंगणवाडी सुरू केली. आणि सेक्स वर्कर अमिरबी शेख यांच्या कार्याचं आणखी एक पाऊल पुढे पडलं. चार वर्षांपूर्वी अमिरबी शेख यांनी देशातील पहिली वेश्या वस्तीतील शाळा सुरू केली.
त्यामुळे वेश्या वस्तीतील महिलांना शिक्षणाचं वेगळं जग दिसलं. अशा समाजसेविकेचा झी 24 तासनं अनन्य सन्मान पुरस्कारानं गौरव केला. आणि दुर्लक्षित अमिरबी शेख यांचं कार्य जगासमोर आलं. आता राज्य सरकारनं इथं आंगणवाडी सुरू केल्यामुळे त्यांच्या कार्याला आणखी उभारी मिळाली. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी या अंगणवाडीचं उदघाटन केलं.
सांगलीसारखं पुनर्वसनाचं रोल मॉडेल देशातील सर्व ठिकाणी राबवलं गेलं तर वेश्या व्यवसाय करणा-या महिला तुलनेनं खरंच सुखी जीवन जगू शकतील.
व्हिडिओ पाहण्यासाठी
First Published: Wednesday, July 4, 2012, 23:38