Last Updated: Sunday, July 29, 2012, 14:29
www.24taas.com, बीडबीडमधील डॉक्टर संपावर गेलेत. स्त्री-भ्रूण हत्येप्रकरणी दोषी डॉक्टरांवर मोक्का लावण्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मागणीचा निषेध म्हणून डॉक्टरांनी संप पुकारलाय. या संपामुळे रूग्णांचे मात्र हाल सुरू आहेत.
बीडमधील डॉ. सुदाम मुंडे यांच्या स्त्री-भ्रूण हत्येच्या प्रकरणानंतर राज्य सरकारनं धडक मोहिम हाती घेतलीय. अनेक ठिकाणी छापे मारून सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या तसच डॉक्टारांचे परवाने रद्द करण्यात आले. बीडमध्येही दोषी डॉक्टरांना मोक्का लावण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी केलीय. मात्र त्याविरोधात आता सर्वच डॉक्टरांनी संपाचा पवित्रा घेतलाय. पुरोगामी महाराष्ट्रात एकीकडे स्त्री-भ्रूणहत्येचे प्रकार दरदिवशी समोर येतायेत तर दुसरीकडे दोषी डॉक्टरांच्या समर्थनासाठी इतर डॉक्टरांनी संपाचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे स्त्री-भ्रूणहत्या खरोखरच थांबणार का? हा प्रश्न यानिमित्तानं पुन्हा उपस्थित झालाय.
.
First Published: Sunday, July 29, 2012, 14:29