मिठाई खा; हॉस्पटलमध्ये जा! - Marathi News 24taas.com

मिठाई खा; हॉस्पटलमध्ये जा!

www.24taas.com, यवतमाळ 
घाणीच्या साम्राज्यात गल्लीबोळात असलेल्या या झोपड्यांमध्ये भेसळयुक्त पदार्थांपासून मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आलाय. काही परप्रांतीय कारागीर हे खाद्यपदार्थ तयार करून शहरातील दुकानांमधून ग्राहकांच्या माथी मारत असल्याचं नागरिकांनी उघडकीस आणलं. या प्रकारामुळे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री मनोहर नाईक यांच्या जिल्ह्यातच नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं स्पष्ट झालंय.
 
यवतमाळमध्ये दररोज मध्यप्रदेशातून भेसळयुक्त कुंदा आणि खवा आणून त्याद्वारे मिठाई तयार केली जात आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना कारखान्यांतून ही मिठाई आणि खाद्य पदार्थ बनवून विकली जाते. मात्र, या प्रकाराकडे अन्न आणि औषध प्रशासनाकडून कानाडोळा केला जातोय.
 
नागरिकांच्या जीवाशी असाच खेळ सुरु राहिला तर भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे विषबाधा होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
.

First Published: Thursday, August 2, 2012, 19:22


comments powered by Disqus