Last Updated: Sunday, January 8, 2012, 12:52
www.24taas.com, मुंबई 
मुंबई महापालिका निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, टीम अण्णा आणि त्यांच्या आंदोलनावर टीका केली आहे . सामना मध्ये प्रसिद्ध झालेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी विरोधकांचांही समाचार घेतला आहे.
टीम अण्णांमध्ये मतभेद आहेत. हे सगळे उडाणटप्पू आहेत. तो केजरीवाल, किरण बेदी, काय सिसोदिया काय सगळेच उड्डाणटप्पू आहेत. शांतीभूषणची भानगड बाहेर आली ना त्याने सरकाला महात्मा गांधी वैगरे जेंव्हा उपोषणाला बसत होते, त्यांची कारणं निराळी होती. हे कसलं कारण, लादणं आणि जबरदस्ती करणं म्हणजे एक राजकीय बलात्कार आहे.
First Published: Sunday, January 8, 2012, 12:52