दाऊदला ओढ मुंबईच्या मुठ'माती'ची - Marathi News 24taas.com

दाऊदला ओढ मुंबईच्या मुठ'माती'ची

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
शेकडो निष्पाप लोकांचा खून करणा-या अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम कासकरचा मनात मृत्यूचे भय निर्माण झाले आहे. मृत्यूनंतर दाउदच थडगं मुंबईत उभारण्याची तयारी सुद्धा होउ लागली आहे. डी-कंपनीचे गुंड मुंबईत दाउदचा अंत्यविधीसाठी जागा शोधत आहेत. दाऊदला स्वतःचं थडगं मुंबईत बांधायचे आहे.  दाऊदला आतापर्यंत दोन वेळ हार्ट अटॅक येऊन गेला आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून डी-कंपनीचे गुंड मुंबईतील कब्रस्तानाचा फे-या मारत आहेत. आपल्या मृत्यूनंतर आपलं थडगं मुंबईत बांधण्याची शेवटी इच्छा दाउदने व्यक्त केली आहे...मुंबई क्राईम ब्रांच डी-कंपनीचा गुंडांचा या हालचालांवर लक्ष ठेवून आहे. आता पर्यंत कुठलीच जागा दाऊदला मिळू शकलेली नाही आहे.
जर मुंबईत जागा मिळाली नाही तर दाऊदच्या मुळ गावी म्हणजे कोकणातील खेड तालुक्यात थडगं बांधण्याचा विचार केला जात आहे. मुंबई पोलीस दलात काम करणा-या पोलीस हवालदाराचा मुलगा असलेल्या दाऊद इब्राहिमच कुटुंब खेड मध्ये राहायचं..
ह्या ठिकाणी दाऊदच्या पुर्वजांचे थडगं बांधण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत दाऊदच्या अंत्यविधीसाठी जर मुंबईत जागा नाही मिळाली तर खेडमध्ये अंत्यविधी केला जाण्याची शक्यता आहे..
1984 ला भारतातून दुबईला पळालेल्या दाउदला आता दररोज स्वतःचा मृत्यू समोर दिसत आहे....दाउदने परदेशात राहून अंडरवर्ल्डमध्ये अब्जावधींचा साम्राज्य उभं केला...
बाप म्हणून दोन्ही मुलींच लग्नही चांगल्या कुटुंबात केलं. दाऊद सांसरिक बंधनातून मुक्त झाला खरा....मात्र जगाला दहशतवादाच्या खाईत लोटणा-या लादेन आणि क्रूर हुकूमशहा गद्दाफीला मृत्यूनंतर कुठं दफन केलं याचा जगाला थांगपत्ताही लागू दिला नाही...आपलीही अखेर अशी होईल की या भीतीनं क्रूरकर्मा दाऊद आतापासून आपल्या सोयीचं कब्रस्तान शोधू लागला आहे.

First Published: Friday, November 11, 2011, 11:17


comments powered by Disqus