Last Updated: Friday, November 11, 2011, 13:40
झी २४ तास वेब टीम, मुंबईसरकार फी वाढीबाबत काय़दा बनवुनही पालकांना न्याय देऊ शकली नाही. शेवटी पालकांनाच स्वत: न्याय मिळवण्यासाठी लढावं लागतं. मुंबईतील एका पालकांनी शाळेची वाढीव फी न भरल्याने तिच्या पाल्याला शाळेनं काढलं. मात्र विरोधात ती सुप्रिम कोर्टापर्यत गेली आणि न्याय मिळवला.
अविषा कुलकर्णी ही एक अशी आई आहे की जिने आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी थेट सुप्रिम कोर्टापर्यंत लढा दिला आणि न्याय मिळावला. गोरेगावच्या विबग्योर शाळेनं आविशाची मुलगी आदिश्रीने शाळेची वाढीव फी न भरल्याने तिला शाळेतुन काढुन टाकलं. यावर उच्च न्यायालयात आविषा गेल्या, तिथे न्याय न मिळाल्याने सुप्रिम कोर्टात गेल्या आणि अखेर त्यांना न्याय मिळाला.
लढा सुरु झाला 2009 पासुन.. विबग्योर शाळेनं अचानक 50 टक्के फी वाढवली. फी भरण्यास विरोध केला आणि शाळेविरोधात पोलिसात तक्रार केल्याने आदिश्रीला विबग्योर शाळेनं काढुन टाकलं. पोलिस, उच्च न्यायालयाने दोन्ही कडून न्याय मिळाल्यानं सुप्रिम कोर्टात स्वत: केस लढल्या. आदिश्रीवरील शाळेतुन काढुन टाकल्याचा डाग पुसला गेला. आदिश्रीला न्याय मिळाल्याने आता इतर सामान्य पालकांनाही शाळेच्या मनमानी विरोधात आवाज उठवण्याचा आत्मविश्वास आला आहे.
First Published: Friday, November 11, 2011, 13:40