Last Updated: Thursday, November 10, 2011, 18:01
झी २४ तास वेब टीम, मुंबईवैद्यकीय शाखेच्या पदवी आणि पद्युत्तर अभ्या

सक्रमाच्या प्रवेशासाठी २०१२-२०१३ मध्ये घेण्यात येणाऱ्या नॅशनल कॉमन एन्ट्रन्स टेस्टमधून सूट देण्यात यावी या महाराष्ट्र राज्याने केलेली विनंतीचा विचार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. यासंदर्भात उद्या सूनावणी होणार आहे. राज्य सरकारने राज्य बोर्ड आणि सीईटीच्या अभ्यासक्रमात असलेला फरक आणि इतर बदल विद्यार्थ्यांना अडचणीचे आणि अवघ़ड ठरु शकतील असं म्हणणं सर्वोच्च न्यायालयात मांडलं होतं.
आंध्र प्रदेश सरकारने अशीच याचिका केली होती त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील विनंती केली. आंध्र प्रदेश सरकारने अभ्यासक्रमात असलेला फरक आणि भाषेचा अडसर यामुळे ही परिक्षा विद्यार्थ्यांना देणं अवघड जाईल असं म्हणणं मांडलं होतं. नवीन नॅशनल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट ही विद्यार्थ्यांनी इंग्रजी किंवा हिंदी भाषेत देणं अनिवार्य आहे. आणि राज्यातल्या कॉमन एण्ट्रन्स टेस्ट प्रमाणे कोणत्याही प्रादेशिक भाषेत ती देता येणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरणार आहे. राज्य बोर्डांच्या मे २०१२ ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा जवळपास ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे आणि मध्येच कोणताही बदल त्यांना त्रासदायक ठरणार आहे.
First Published: Thursday, November 10, 2011, 18:01