Last Updated: Wednesday, March 14, 2012, 15:52
केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचे हे पहिले रेल्वे बजेट आहे. आपल्या पहिल्या वहिल्या रेल्वे बजेटमध्ये त्रिवेदी सर्वसामान्य प्रवाशांना खूश करतात की निराश हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्रातील सात विभागात कोण कोणत्या मागण्या आहेत. याचा हा एक्स्ल्युझिव्ह आढावा...
तब्बल ९ वर्षांनी रेल्वेची भाडेवाढरेल्वे मंत्र्यांनी अर्थसंकल्पात भाडे वाढ केली असली तरी सर्वसामान्यांना कमीत कमी भार पडेल याची काळजी त्यांनी घेतली आहे. गेल्या आठ वर्षात होणारी ही पहिली भाडेवाढ आहे
..........................
रेल्वे बजेटमध्ये मुंबईला काय मिळाले?रेल्वे मंत्र्यांच्या काही घोषणांमुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळू शकणार आहे. मुंबईसाठी मुंबईसाठी ७५ नव्या लोकल गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीचा प्रवास काही प्रमाणात सुखर होणार आहे.
..........................
जान है तो जहाँ है- रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदीकेंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडायला सुरवात केली आहे. त्रिवेदींनी रेल्वे सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं आहे. जान है तो जहाँ है हे आमचे ब्रीद वाक्य असेल असं ते म्हणाले
..........................
रेल्वे बजेट हे सामान्य माणसाचं असणार – रेल्वेमंत्रीसंसदेत रेल्वे बजेट मांडण्यापूर्वी आज रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, 'सामान्यांसाठी हे रेल्वे बजेट चागंल असणार आहे'. (आम आदमी के लिए रेल बजेट अच्छा होगा) या शब्दात त्यांनी आपलं मत माडलं.
..........................
रेल्वे बजेट: यंदा रेल्वे भाडेवाढ होणार?रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी आज रेल्वे बजेट २०१२-१३ मांडणार आहेत. रेल्वे प्रवाशांना या बजेटकडून फारच अपेक्षा असणार आहेत. आर्थिक संकटात असणार जग आणि त्यातच सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्क असणाऱ्या रेल्वेसाठी आर्थिक भार उचलण्यासाठी दिनेश त्रिवेदी नक्की काय करणार हे देखील महत्त्वाचं आहे.
मध्य रेल्वेला ‘कोणी नव्या ट्रेन देतं का ट्रेन’?उपनगरीय रेल्वेचा सर्वात जास्त विस्तार असलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा आहेत. लोकल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याची दरवर्षीची मागणी नेहमीच अपुरी राहते.
..........................

रेल्वे बजेट – काय आहे तुमच्या अपेक्षा!केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी उद्या २०१२-१३ वर्षाचे रेल्वे बजेट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहे. भारतीय रेल्वे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोट्यवधी भारतीयांना भारतीय रेल्वे आपल्या इच्छित स्थळी पोहचवत सते. त्यामुळे आपल्या लाडक्या रेल्वेकडून भारतीयांना अनेक अपेक्षा आहेत.
..............................

रेल्वे अपघातांना आळा बसणार का?जीवघेण्या गर्दीमुळे लोकलमधून पडणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, लोकल प्रवास करतांना रेल्वे खांबाचा धक्का लागणे, लोकलमध्ये चढतांना प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्यांच्यामध्ये असलेल्या अंतराने अपघात होणे अशा विविध घटनांची गेल्या पाच वर्षातील धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.
...............................

नांदेडला सापत्न वागणूकमराठवाडा रेल्वे विभाग तसा कायम दुर्लक्षितच राहिलाय. नांदेड महाराष्ट्रात असला तरी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आलय. हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेडला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालीये.
.................................

वेस्टर्न रेल्वेला लोकल वाढणार का?पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे डीसी ते एसी असे विद्युत परिवर्तन पूर्ण झाल्याने आता लोकल वाढवण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत. एसी विद्युत प्रणालीमुळे लोकल गाड्यांचा वेग वाढवणे शक्य होणार आहे.
.................................

विदर्भात रेल्वेतही अनुशेषगेल्या एक दशकापासून विदर्भातला अमरावती-नरखेड प्रकल्प अपूर्ण आहे. शिवाय अनेक नव्या रेल्वेमार्गाच्या मागण्याही प्रलंबित आहेत. त्यामुळे 14 मार्चला सादर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरकरांच्या या मागण्यांना विचारात घेऊन विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
...............................

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरकरांवर केला अन्यायकराड-चिपळूण या नव्या रेल्वेमार्गासाठी राज्यशासनानं निधी मंजूर केलाय. त्यामुळं कोल्हापूर कोकणाला जोडला जाण्याची शक्यता मावळलीये. मुख्यमंत्र्यांनी आपल्या तालुक्यासाठी कोल्हापूरकरांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त होतेय.
.................................

रेल्वेचे सावत्र अपत्य ‘हार्बर रेल्वे’१६ मार्चला रेल्वे बजेट सादर होणार असल्याने सर्व मुंबईकराचं त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. समस्यांचा रेल्वे मार्ग म्हणून हार्बर रेल्वे मार्गाची ओळख आहे. रेल्वेचे सावत्र अपत्य असल्यासारखी वागणूक हार्बर रेल्वेला आणि पर्यायाने तिथल्या रेल्वे प्रवाशांना मिळत असल्याची टीका प्रवासी संघटना करत आल्या आहेत.
.................................

नाशिकची राज्यराणी एक्सप्रेस मार्गस्थगेल्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर झालेली राज्यराणी एक्सप्रेस आजपासून मार्गस्थ झाली. नाशिकहून सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी निघणा-या या रेल्वेमुळं चाकरमान्यांना कार्यालयीन वेळेत मुंबईत पोचणं शक्य होणार आहे.
.................................

औरंगाबाद पर्यटनाकडे कानाडोळामराठवाड्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणजे औरंगाबाद. इथं येणा-या पर्यटकांची संख्या जास्त असूनही रेल्वे मार्गाच्या बाबतीत मात्र प्रवाशांच्या पदरी घोर निराशाच पडलीय. मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले आहेत. नेत्यांकडे इच्छा आहे पण प्रभावी रेट्याचं टॉनिक नाही त्यामुळे मराठवाडा विभाग अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे.
.................................

रेल्वे बजेटकडून पुणेकरांना अपेक्षापुणे शहराचा बदलता चेहरामोहरा, वाढती लोकसंख्या, उद्योग व्यवसायातील प्रगती लक्षात घेता पुणेकरांच्या रेल्वे बजेटकडून अनेक अपेक्षा आहेत. यापैकी काही रेंगाळलेले प्रकल्प सुरु करण्याबातच्या आहेत.
.................................

रेल्वे तिकीट दर वाढण्याची शक्यतामहागाईच्या भडक्यात आता रेल्वेचे तिकीट दरही वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेतच रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मुंबईत दिलेत. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगताना रेल्वेच्या खाजगीकरणबाबतही विचार सुरु असल्याचं त्रिवेदी यांनी म्हटलं आहेत.
................
व्हिडिओ
First Published: Wednesday, March 14, 2012, 15:52