बजेटची क्षेत्रानुसार ठळक वैशिष्ट्ये - Marathi News 24taas.com

बजेटची क्षेत्रानुसार ठळक वैशिष्ट्ये

 


 
 


आज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २०१२-१३ या आर्थिक वर्षासाठी देशाचं केंद्रीय बजेट मांडलं. यावेळी उत्पन्नामध्ये सूट दिली आहे, तर सर्व्हिस टॅक्स वाढल्यामुळे सर्व वस्तू महागल्या आहेत.


.

बजेटची क्षेत्रानुसार ठळक वैशिष्ट्ये 


 
.

.


.


.


जीडीपी


*    आर्थिक विकास दर 6.9 टक्के राहील
*    अन्य देशांच्या तुलनेत भारत पुढे
*    इतर देशांपेक्षा भारताला झळ कमी
*    कर्ज वाढल्यानं जीडीपी कमी
*     आता कठोर निर्णय घेण्याची वेळ- मुखर्जी
*     आगामी वर्षात 7.6 टक्के जीडीपी अपेक्षित
 
.
.

.


काळा पैशाबाबत धोरण


*     काळ्या पैशाला आळा घालण्याची गरज
*     काळ्या पैशांसदर्भात या अधिवेशनात श्वेतपत्रिका...भाजपची मागणी मान्य
*     82 देशांमधून काळा पैसा परत आणण्याबाबत सहमती..82 देशांशी सामंजस्य करार
-     


.


.


.


महागाई


*     गेल्या वर्षा महागाई प्रचंड वाढली...भूकंप आणि वाढते तेलाचे भाव तसंच कर्ज महागल्यानं महागाई वाढली..अन्न उत्पादन घटल्यानं महागाई वाढली..
*     येत्या काही महिन्यात महागाई आटोक्यात येईल
 

.
 
.
.

करप्रणाली (टॅक्स कोड)


*     सर्व्हिस टॅक्स आणि एक्साईज टॅक्समध्ये 2 टक्क्यांनी वाढ
*     सर्व्हिस टॅक्स 10 टक्क्यावरून 12 टक्के
*     डायरेक्ट टॅक्स कोड पुढच्या वर्षी लागू होणार...टॅक्स कोडमुळे नोकरदारांना फायदा...DTC मुळे करचोरी रोखता येणार
*     गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) ऑगस्टपासून लागू होणार
*      आता व्हॅटऐवजी GST
*     डायरेक्ट टॅक्समध्ये अपेक्षित उत्पन्न नाही
*     करांच्या माध्यमातून यंदाचं उत्पन्न 7 लाख 71 हजार कोटी
*     अपेक्षेपेक्षा 15 टक्के जास्त टॅक्स वसूल
*     वित्तीय तूट 5.9 टक्के होती...2013 ची वित्तीय तूट 5.1 टक्के अपेक्षित
 

.
 

.


.


टॅक्स सवलत


*    आयकर मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढवली..2 लाखांपर्यतच्या उत्पन्नावर टॅक्स नाही
*    2 ते 5 लाखांपर्यंत 10 टक्के टॅक्स
*     5 ते 10 लाखापर्यंत 20 टक्के टॅक्स
*    10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स
*    कॉर्पोरेट टॅक्समध्ये कुठलाही बदल नाही...
*    बचत खात्यातल्या 10 हजारपर्यंतच्या व्याजावर टॅक्स नाही
*     सीनियर सिटीजन्सना एडव्हान्स टॅक्स नाही...
*    10 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणा-यांना सूट
*     10 लाखापर्यंत उत्पन्न असणा-यांना 50 हजारावर 50 टक्के सूट
*    शेअर बाजारात 50 हजार गुंतवणुकीवर 25 हजार सूट
*    अर्थमंत्र्यांच्या घोषणेनं शेअर बाजार सुधारला
*    होम लोनवर 1 टक्का सूट कायम राहणार
*    छोट्या घरांसाठी 5 हजार कोटींचा
 
 .

.
.
.

 अनुदान (सबसिडी)


*    वाढत्या सबसिडीमुळे आर्थिक नुकसान
*    काही सबसिडी कमी करणार
*    इंधनाच्या सबसिडीत कपातीचे संकेत
*    रॉकेलवर डायरेक्ट सबसिडी मिळणार
  50 जिल्ह्यात रॉकेलवर सबसिडी मिळणार
*     खतांवरची सबसिडी सुरूच राहणार...शेतकरी, खतविक्रेत्यांना डायरेक्ट सबसिडी
*    शेतक-यांना थेट कॅश सबसिडी
*    15 ते 25 लाखांच्या घरांना सबसिडी कायम
 

.
.
.

 शिक्षण


  आगामी वर्षात देशात 6 हजार शाळा
*     एज्युकेशन लोनसाठी वेगळा फंड
  गरीब विद्यार्थ्यांसाठी क्रेडीट गॅरंटी फंड
*    शिक्षण हक्कासाठी 25 हजार कोटी
 

.


.


.


आरोग्य


*    राष्ट्रीय आरोग्य योजनेसाठी (NHRM) 20 हजार 822 कोटी
  राष्ट्रीय शहर आरोग्य योजना सुरू करणार
  एम्सच्या धर्तीवर 7 नवे मेडिकल कॉलेज सुरू करणार
*    देशभरात पोलिओचं समूळ उच्चाटन
 



.


.


.


कृषी


*    कृषी क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य...कृषी क्षेत्राचं बजेट 20,208...18 टक्क्यांची अधिक तरतूद
*    धान्याच्या उत्पादनात कमालीची वाढ.
*    कृषी कर्जात 1 लाख कोटींची वाढीव तरतूद
*     कृषी संशोधनासाठी 200 कोटींची तरतूद
*     विदर्भातील सिंचनासाठी 300 कोटी
*     हरित क्रांतीसाठी 1 हजार कोटी
*    वेळेत कर्ज फेडल्यास 3 टक्के सूट
*    किसान क्रेडीट कार्ड ATMमध्ये चालणार
*      किसान क्रेडीट कार्ड स्मार्ट कार्ड बनवणार
*      यंदाचा कृषी विकास दर 2.5 टक्के
*     धान्यसाठा करण्यासाठी नवीन गोडाऊन्स उभारणार
*     खाद्यपदार्थ निर्यातीत 22 पटीनं वाढ...खाद्यपदार्थ निर्यातीचा भारताला फायदा
*     अन्नसुरक्षा कायद्यासाठी निधीची तरतूद करणार
 

.


.


.


ग्रामीण विकास


*    गावांमध्ये पाणीपुरवठा आणि टॉयलेट बांधण्यासाठी 14 हजार कोटी
  गावांमध्ये रस्ते बनवण्यासाठी 24 हजार कोटी
*    ग्रामीण भागातल्या सुविधांसाठी 20 हजार कोटी
 

.


.


.


संरक्षण


*    संरक्षण क्षेत्रासाठी 1 लाख 93 हजार कोटींची तरतूद
 
 

.


.


..


.गुंतवणूक/निर्गुंतवणूक


*    खाजगी गुंतवणुकीला प्राधान्य देणार
*    FDI च्या सहमतीसाठी प्रयत्न सुरू
*    रिटेल क्षेत्रात 51 टक्के FDI साठी प्रयत्न
*    विदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणार
*     2013 मध्ये 30 हजार कोटी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य
*    हवाई क्षेत्रात 49 टक्के FDI विचाराधीन
 

.


.


.


बँकींग


  ग्रामीण विकास बँकांची कामगिरी समाधानकारक
*    पेन्शन बँकींग विधेयक आणणार
*     राजीव गांधी इक्विटी गुंतवणुकीत 50 टक्के सूट
*    60 हजार कोटींचे इन्फ्रा बाँड बाजारात आणणार
*    बँकांना 15 हजार 890 कोटींची मदत
 


.


.
.

योजना आणि तरतूद


*    पायाभूत सुविधा मजबूत बनवण्यावर भर
*    8800 किमीचे रस्ते बांधणार
*    आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढणार...पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याचे संकेत
*    आगामी तीन वर्षात तूट कमी करणार
*    परदेशातून विमानाचं इंधन मागवणार
*    इचलकरंजीमध्ये पॉवरलूम मेगाक्लस्टर योजना...औद्योगिक वसाहतीसाठी 20 कोटी
*    मिड डे मिलचा चांगला परिणाम...मिड डे मिल (माध्यान्ह भोजना)साठी 11 हजार 937 कोटी
*    15 हजार 850 कोटी बालविकासासाठी
*     सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करणार
*    गुंतवणूक, कृषी, ऊर्जा, परिवहन क्षेत्रावर काम करण्याची गरज
*    कुपोषणावर काम करण्याची गरज
*    अपंग आणि विधवांचं पेन्शन 200 वरून 300 रुपये
*     मागासलेल्या भागांसाठी अधिक निधीची तरतूद
*    वीज क्षेत्रासाठी 10 हजार कोटींचे टॅक्स फ्री बाँड
-    ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करणार
-    पंचवार्षिक योजनेच्या 99 टक्के योजनांचं काम फत्ते
 
 

.
.
.

महाग


*    विमान प्रवास महागणार
  मोठ्या कार महागणार
*    चैनीच्या वस्तू, हॉटेलिंग महागणार
*      टीव्ही, फ्रिज महागणार
*     पार्लर
*     ड्रायक्लीन
  परदेशी सायकल
*      सिगारेट
  मोबाईल, दागिन्यांच्या किंमतीत वाढ नाही
 

.
.
.

स्वस्त


*     मोबाईल
*    LCD, LED टिव्ही
*    मीठ
*     सोया उत्पादन
*     माचिस
*      चांदीचे ब्रँडेड दागिने
*      औषधं

First Published: Friday, March 16, 2012, 18:59


comments powered by Disqus