माहितीच्या अधिकारात सरकारने केले बदल - Marathi News 24taas.com

माहितीच्या अधिकारात सरकारने केले बदल

www.24taas.com, मुंबई
 
राज्य सरकारनं आरटीआयच्या नियमांत बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार माहिती विचारणारा अर्ज फक्त १५० शब्दांचा असावा अशी अट घालण्यात आली आहे. तसंच फक्त एका अर्जात एका विषयाचीच माहिती मिळणार आहे. या नव्या नियमांबाबत सरकारच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जातो आहे.
 
सरकारच्या या नोटीशीमुळे आता माहितीच्या अधिकारात माहिती मिळवणं अवघड झालं आहे. या नोटीशीच्या माध्यमातून सरकारनं माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्याच्या नियमांत बदल केले आहेत. यापुढे माहितीचा अर्ज फक्त १५० शब्दांचाच असावा लागणार आहे.  तसंच एक अर्ज केल्यावर फक्त एका विषयाचीच माहिती मिळणार आहे.  एकाच विषयाची वेगवेगळी माहिती हवी असल्यास वेगवेगळे अर्ज करावे लागणार आहेत.
 
सरकारच्या या निर्णयावर आरटीआय कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला आहे. आदर्श घोटाळा असो की अन्य छोटे मोठे घोटाळे. प्रत्येक घोटाळा उघड होण्यात माहितीच्या अधिकाराचा मोठा वाटा आहे. त्यामुळचं या नोटीशीच्या आधारे सरकार आरटीआयचा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका येते आहे.
 
 
 

First Published: Monday, April 2, 2012, 23:20


comments powered by Disqus