Last Updated: Thursday, November 24, 2011, 17:22

झी २४ तास वेब टीम, पुणेव्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या भेटीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुण्यात आगमन झाले. पुण्यातील भेटीत पत्रकारांशी बोलताना शिवसेनाप्रमखांनी जून्या आठवणींना उजाळा. लक्ष्मण १९४९ साली फ्री प्रेस सोडून टाईम्समध्ये गेले. लक्ष्मण फ्री प्रेसमध्ये असताना मला भेटायला येत असत. आमच्या हातांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे राजकारणी कापरे भरायचे आता वयोमानाने आमचे हातच थरथरतात. एक व्यंगचित्र शंभर अग्रलेखांच्या बरोबरीचे असते. व्यंगचित्र सर्वसामान्य माणसाला समजतं अग्रलेख समजत नाही. आजच्या राजकीय नेत्यांना व्यंगचित्र समजत नाहीत.
शि.द.फडणीस हे हास्यचित्रकार आहेत. हास्यचित्र वेगळी आहेत. शंकर हे राजकीय व्यंगचित्राच्या क्षेत्रातले पायोनिर आहेत. क्राफ्टमनशीप आणि कल्पना एकत्र आले की सर्वोत्कृष्ट व्यंगचित्राची निर्मिती होते.
शरद पवारांवरील हल्ला हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. माझे आणि त्यांचे जूने संबंध आहेत. राजकीय भांडण, मतभेद आहेत महाराष्ट्राचा मोठा नेता आहे देशात स्थान आहे हे मानावचं लागेल. त्यांचा अपमान हा मराठी माणूस सहन करणार नाही. शरद पवारांची तुलना प्रशांत भूषण आणि सुरेश कलमाडींशी होऊ शकत नाही.
First Published: Thursday, November 24, 2011, 17:22