भ्रष्टाचारप्रकरणी विजय कुमार गावित यांना अभय! Vijay Kumar Gavit Safe

भ्रष्टाचारप्रकरणी विजय कुमार गावित यांना अभय!

भ्रष्टाचारप्रकरणी विजय कुमार गावित यांना अभय!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

संजय गांधी निराधार योजनेतील भ्रष्टाचारप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज नकार दिला.

संजय गांधी निराधार योजनेच्या समितीचे अध्यक्ष म्हणून विजयकुमार गावीत यांनी १९९५ ते १९९९ या काळात ते आमदार असताना १ लाखाहून अधिक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळवून दिला होता. यातील २० टक्के लाभार्थी बोगस आणि मृत होते. याविरोधात विजयकुमार गावीत यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते रमेश गावित यांनी २००२ मध्ये तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांवर ताशेरे ओढत सहा आठवड्यात कारवाईचे आदेश दिले होते. गावित मंत्री असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा आणि कारवाईसाठी परवानगी देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. त्यामुळे राज्य सरकारने गावित यांच्याविरोधात कारवाई करू नये अशी शिफारस राज्यपालांकडे केली होती.. मात्र राज्यपालांनी याप्रकरणी मंत्रिमंडळाचा निर्णय कळवा असे सूचवले होते. त्यानुसार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी हा विषय आणून विजयकुमार गावित यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी देऊ नये असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

मंत्रिमंडळाचा हा निर्णय आता राज्यपालांना कळवला जाईल. त्यानंतर राज्य सरकारचा निर्णय मान्य करायचा की गावितांवर कारवाई करायला राज्य सरकारला भाग पाडायचे हे सर्वस्वी राज्यपालांवर अवलंबून आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, May 22, 2013, 20:43


comments powered by Disqus