अबू आझमींचं टीकास्त्र - Marathi News 24taas.com

अबू आझमींचं टीकास्त्र


www.24taas.com, ठाणे
 
वरिष्ठ नेत्यांसमोर आपली पत वाढवण्यासाठी जितेंद्र आव्हाड पैशाच्या जोरावर नगरसेवक फोडत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा इथल्या सपाच्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
 
मात्र या नगरसेवकांना सपाने कधीच पक्षातून काढून टाकलं होतं असं आझमी यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे ए.एन.रॉय आणि ठाण्याचे विद्यमान आयुक्त के.पी. रघुवंशी यांच्यावरही आझमी यांनी हल्लाबोल केला आहे. शिवाय केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शिद यांच्यावरही आझमी यांनी टीका केली.
 

First Published: Monday, January 16, 2012, 08:20


comments powered by Disqus