Last Updated: Tuesday, January 17, 2012, 20:29
www.24taas.com,मुंबई 
भाजप नेत्यांचे पीए आणि नातेवाईकांना तिकिटं दिली जाणार नाहीत, असं सांगतानाच अमित साटम हे मुंडेंचे पीए नव्हेत तर कार्यकर्ते आहेत, असा खुलासा मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यांनी केलाय.... अपवाद म्हणून काही ठिकाणी नातेवाईकांना तिकीट दिलं जाईल, असं सांगत नेत्यांची आशा त्यांनी कायम ठेवली....
विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे एकेकाळचे पीए अमित साटम आणि किरीट सोमय्या यांचे पीए दीपक दळवी यांना भाजपचं तिकीट मिळेल अशी चर्चा सुरु असताना पुरोहित यांनी या दोघांची पाठराखण केली.... साटम आणि दळवी हे पीए नव्हेत तर भाजपचे कार्यकर्ते आहेत, असं त्यांनी सांगितलं आणि कार्यकर्त्यांना वगळून नातेवाईंकांना तिकीट दिलं जाणार नाही, असा खुलासा त्यांनी केला.... भाजपची पहिली यादी 21-22 तारखेपर्यंत जाहीर होईल, अशी माहितीही त्यांनी दिली....
First Published: Tuesday, January 17, 2012, 20:29