मनसे परीक्षा झाली, २२ जानेवारी निकालाची बारी - Marathi News 24taas.com

मनसे परीक्षा झाली, २२ जानेवारी निकालाची बारी

www.24taas.com, मुंबई
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिकेसाठी घेतलेली बहुचर्चित परीक्षा खुपच गाजली होती. आता या परीक्षेचा निकाल लवकरच म्हणजे २२ जानेवारीला जाहीर होण्याची शक्यता आहे.
 
कोणत्या विभागातून कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचं यासाठी राज ठाकरे यांनी याद्या बनवण्याचं काम हाती घेतलं असून ते अंतिम टप्प्यात आलं आहे. पहिली यादी ही मुंबई आणि पुण्याची असणार आहे. तेथील उमेदवारांच्या परीक्षा निकालानुसार उमेदवारी वाटप केलं जाणारं आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार निवडीसाठी उमदेवारांच्या परिक्षा तसेच मुलाखती घेतल्या आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईसह पुणे आणि नाशकातही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

First Published: Thursday, January 19, 2012, 19:54


comments powered by Disqus