Last Updated: Tuesday, January 24, 2012, 11:33
www.24taas.com, ठाणे 
सध्या राष्ट्रवादीचे ठाण्यातले आमदार जितेंद्र आव्हाड चर्चेत आहेत ते तिथल्या राजकीय घडामोडींमुळे. आता हेच आव्हाड आणखी एक आव्हान स्वीकारणार आहेत. ते आव्हान आहे थेट मुख्यमंत्रीपदाचं. लवकरच आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत दिसतील. ही इज बॉर्न ऍक्टर. असं बोललं जातं आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल.
जितेंद्र आव्हाड जन्मत:च चांगले अभिनेते आहेत असं आम्ही नाही तर मॅटर या सिनेमाचा डायरेक्टर सतीशचं म्हणणं आहे. आता अभिनय आणि आव्हाड यांचा काय संबंध हा प्रश्न तुम्हाला भेडसावत असणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की जितेंद्र आव्हाड आता सिल्व्हर स्क्रीनवर झळकणार आहेत. ते मॅटर या सिनेमातून. तरुणाईला खुणावणाऱ्या या सिनेमात आव्हाडांनी कोणती भूमिका वठवली आहे. हे पाहणं मजेशीर असणार आहे.
प्रत्येक नेत्याचं जे स्वप्न असतं तेच स्वप्न आव्हाडांनी सिनेमात का होईना पण पूर्ण करुन घेतलं आहे. मात्र या सिनेमातला त्यांचा लूक अद्याप रिव्हील झाला नसला तरीही लवकरच आपल्याला सी एम च्या खुर्चित बसलेले जितेंद्र आव्हाड स्क्रीन वर पहायला मिळणार आहेत. तेव्हा जितेंद्र आव्हाड याचं अभिनय कौशल्य आता प्रेक्षकांना भावतंय का हेच पहायचं.
First Published: Tuesday, January 24, 2012, 11:33