राज ठाकरे यांची तोफ धडाडणार.... - Marathi News 24taas.com

राज ठाकरे यांची तोफ धडाडणार....

www.24taas.com, मुंबई
 
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. राज यांच्याकडे शिवसेनेचं मन ओळखण्याचं यंत्र आहे का याबाबत ते काय उत्तर देतात याचीही उत्सुकता आहे. शिवाय निवडणूक आयोगानं दिलेला कारवाईचा इशारा याबाबतही राज काय भूमिका घेतात याकडंही साऱ्याचं लक्ष आहे.
 
निवडणूक आयोगाचं काय लोणचं घालायचं आहे का ? या राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा निवडणूक आयोग नीला सत्यनारायण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षाची मान्यताच रद्द केली जाऊ शकते असे सांगितले आहे. तेव्हा ज्या आयोगाने अजित पवारांना समज देऊन सोडले त्याच आयोगाने राज ठाकरे यांच्या पक्षाची मान्यता रद्द केली जाईल असे म्हटल्यांने राज ठाकरे आता नक्की काय भुमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
तसंच बहुचर्चित घेतलेल्या उमेदवारांच्या परीक्षा याबाबत त्यांचा निकाल आणि उमेदवारी याबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे देखील साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मनसे उमेदवारांच्या मुलाखती आणि निकाल याबाबत मात्र चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
 
 

First Published: Tuesday, January 24, 2012, 14:00


comments powered by Disqus