Last Updated: Friday, January 27, 2012, 21:28
www.24taas.com, मुंबई मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आज उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर सभागृहात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज इच्छुकांचा मेळावा होतोय. त्यात राज ठाकरे इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.
सुमारे बाराशेहून अधिक इच्छुकांनी मनसेकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केलीए. महापालिकेमध्ये २२७ वॉर्ड असल्याने १२०० इच्छुक उमेदवारांमधून २२७ जणांनाच उमेदवारी मिळणारेए. सर्वच राजकीय पक्षांमध्ये डावललेल्या उमेदवारांकडून बंडखोरीची शक्यता असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या घोषणा अद्याप झालेल्या नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने मनसेची उमेदवारीची घोषणा कधी होतेय याकडे लक्ष लागलं आहे.
First Published: Friday, January 27, 2012, 21:28