Last Updated: Friday, January 27, 2012, 21:28
www.24taas.com, ठाणे उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींसोबत खासदार आनंद परांजपेंनीही हजेरी लावल्यामुळे वातावरणात एक वेगळाच रंग भरला होता.
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीनं पहिल्या सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष ज्योती कलानी यांनी पप्पू कलानी, महेश तपासे आणि शेकडो कार्यकर्त्यांसह यात्री निवास या निवडणूक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीसोबत असलेले आनंद परांजपे नंतर कलानी महाल या पप्पू कलानींच्या निवासस्थानीही गेले.
त्यानंतर मात्र आपण केवळ ज्योती कलानींना शुभेच्छा देण्यासाठी आलो असून अजूनही आपण शिवसेनेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत दिसणाऱ्या आणि शिवसेनेतच आहे असं सांगणाऱ्या परांजपेच्या वक्तव्यांमुळं कार्यक्रर्त्यांमध्ये संभ्रम दिसत होता.
First Published: Friday, January 27, 2012, 21:28