Last Updated: Sunday, January 29, 2012, 19:23
www.24taas.com, मेरठ 
१३/७ रोजी मुबंईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी दोन जणांना बिहारमधून अटक करण्यात आली. त्यानंतर उत्तरप्रदेशातून येणाऱ्या लोंढ्यामुळे मुंबईतीत दहशतवादी कारवाया वाढत आहे, त्यामुळे या परप्रातियांच्या लोढ्यांमुळे मुंबई असुरक्षित होत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे राज ठाकरें यांच्यावर आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका राज ठाकरे यांच्याविरोधात मेरठच्या कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
उत्तर भारतीयांविरोधात बोलल्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उत्तर भारतीयांना टार्गेट केले आहे. १३/७ स्फोटातील दहशतवाद्यांना बिहारमधून अटक झाल्याने माझं वक्तव्य खरं ठरलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.
उत्तरप्रदेश नवनिर्माण सेनेच्या संघटनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए के मिश्रा यांच्या कोर्टात ही याचिक दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या ३ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
First Published: Sunday, January 29, 2012, 19:23