Last Updated: Sunday, January 29, 2012, 17:04
www.24taas.com, मुंबई 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महापालिकेतील मनसे उमेदवार जाहीर केले, मात्र त्याच सोबत त्यांनी काल झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयावरील हल्ल्यावर भाष्य केलं.
'ही शिवशाही नव्हे ही तर मोगलाई आहे' असा घणाघाती आरोप करत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टार्गेट केलं आहे. 'मटावरील हल्ला म्हणजे भ्याडपणाचं लक्षणचं म्हटंले पाहिजे', 'स्वत:च्या वृत्तपत्रातून काहीही छापले तरी चालते', स्वत: सामनातून काही आरोप करता कुणालाही विचारपुस न करता बाकी गोष्टी छापता ते चालतं का? स्वत: कधीही शाहनिशा न करता सगळं छापता हे योग्य नाही', असचं राज ठाकरे यांनी शिवसेनेला सुनावले आहे्.
मटावर शिवसेनेनी केलेल्या हल्ल्याबाबत राज ठाकरेंनी टीका केली आहे. शिवसेना मनातून हरलेली असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलं आहे. महाराष्ट्र टाईम्सवरील हा हल्ला म्हणजे शिवसेनेची मोगलाई असल्याचं राज यांनी म्हटलं आहे. शिवसेना ही मनातून हरली असून त्यातूनच हा हल्ला केल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच आपल्या वर्तमानपत्रात दुसऱ्यांचे खुलासे छापता का? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.
First Published: Sunday, January 29, 2012, 17:04