'नाराजां'चा 'राज'ना गराडा - Marathi News 24taas.com

'नाराजां'चा 'राज'ना गराडा

www.24taas.com, मुंबई
 
मनसेनं उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी नाराज इच्छुकांनी त्यांचा रोष प्रकट केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाराज कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता. नाराज कार्यकर्त्यांचं म्हणनं राज ठाकरेंनी ऐकून घेतलं.
 
दादरमध्येही आमदार नितीन सरदेसाईंच्या घरापुढे नाराज कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दुसरीकडे दहिसरमध्येही मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर यांना मनसेचं तिकीट मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज होते. या कार्यकर्त्यांनी दरेकर यांच्या ऑफीसजवळ गर्दी केली होती.
 
आमदार प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. प्रकाश दरेकर यांना भाऊ म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून तिकीट मिळाल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. एकंदरीतच मनसेची उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं स्पष्ट होतं आहे.

First Published: Monday, January 30, 2012, 08:58


comments powered by Disqus