मुंबईत भाजपला हादरा, अळवणींची बंडखोरी - Marathi News 24taas.com

मुंबईत भाजपला हादरा, अळवणींची बंडखोरी


www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा हादरा बसला आहे. मुंबई भाजपमधील दिग्गज नेते पराग अळवणींच्या पत्नी ज्योती अळवणी या प्रभाग क्रमांक ८० मधून अपक्ष निडवणुक लढवणार आहेत.
 
पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या पराग अळवणींनी हा निर्णय घेतला आहे. तसंच उमेदवारी देण्याच्या निकषासंदर्भातही त्यांनी असमाधनी असल्याचं म्हटलं आहे. पराग अळवणी सलगपणे दोन वेळा नगराध्यक्षपदी निवडून आले होते आणि चार वर्षे पक्षाचे महापालिकेत गटनेते होते. अळवणी हे भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.  पराग अळवणी हे मुंबईतील नावाजलेल्या प्रतिष्ठेच्या पार्ले महोत्वाचे आयोजक आहेत.

First Published: Tuesday, January 31, 2012, 13:10


comments powered by Disqus