Last Updated: Tuesday, January 31, 2012, 13:12
www.24taas.com, मुंबई माटुंगा, वडाळा, दादर पाठोपाठ आता घाटकोपरच्या भटवाडी प्रभागात देखील शिवसेनेसमोर बंडखोरीचे आव्हान उभं ठाकलं आहे.
घाटकोपरच्या भटवाडी प्रभागात विद्यमान नगरसेविका शुभांगी शिर्के यांच्या स्नुषा सई शिर्के यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या नगरसेवक राजा चौगुलेंनी बंडाचे निशाण फडकावलं आहे.
आज सकाळीच दादरच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक १८० मध्ये भरत राऊत आणि संजय भरणकर या दोन माजी शाखा प्रमुखांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे मनसुबा जाहीर केल्याने सेनेच्या चिरेबंदी बालेकिल्ल्याला भगदाड पडलं आहे.
First Published: Tuesday, January 31, 2012, 13:12