प्रिय दत्तची समजूत काढू - माणिकराव - Marathi News 24taas.com

प्रिय दत्तची समजूत काढू - माणिकराव

www.24taas.com, मुंबई
 
खासदार प्रिया दत्त नाराज असल्यास त्यांची समजूत काढू असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटल आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष कृपाशंकरसिंह यांच्यावर प्रिया दत्त यांनी मनमानीचा आरोप केला होता. त्यावर माणिकराव बोलत होते. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आपला विरोधी पक्ष नसून राष्ट्रवादीच प्रतिस्पर्धी असल्याचं माणिकराव यांनी म्हटल आहे.
 
शिवसेना आता हद्दपार झाल्याचंही त्यांनी सांगितलं. तिकीट नाकारल्यानं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खासदार प्रिया दत्त समर्थक आक्रमक झाले होते. प्रिया दत्त यांच्या ऑफिससमोर समर्थक कृपाशंकर सिंहविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करत होते. स्थानिक खासदार असतानाही तिकीट वाटपात मला विश्वासात घेण्यात आले नाही. असा आरोप खासदार प्रिया दत्त यांनी केला होता. तसंच खासदारपदाचा राजीनामा देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
 
दत्त समर्थकांना वॉर्ड क्रमांक ८४, ८५ आणि १५० मधून उमेदवारी हवी होती. मात्र याठिकाणी दुसऱ्यांना उमेदवारी दिल्यानं हा वाद निर्माण झाला होता. कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप करणारे निलंबित काँग्रेस नेते अजित सावंत हे प्रिया दत्त यांच्या भेटीला गेले होते. खासदार प्रिया दत्त नाराज असल्यास त्यांची समजूत काढू असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
 
 

First Published: Thursday, February 2, 2012, 14:00


comments powered by Disqus