संजय राऊत यांचा राज, राष्ट्रवादीला टोला - Marathi News 24taas.com

संजय राऊत यांचा राज, राष्ट्रवादीला टोला

www.24taas.com, मुंबई
 
राज ठाकरेंनी स्वत:ची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर करू नये असा टोला, पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावलाय. तसंच शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनला शिवसेनेनेही विरोध केल्याची बाबही राऊत यांनी निदर्शनास आणून दिली.
 
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मोठी परंपरा लाभलेली आहे. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर राज ठाकरेही उपस्थित राहिलेले आहेत, याची आठवणही राऊत यांनी करून दिली. सभेसाठी मैदान उपलब्ध व्हावं, ही सगळ्याच राजकीय पक्षांची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनला शिवसेनेनंही विरोध केल्याची आठवण राऊत यांनी करून दिली.
 
ज्या शिवाजी पार्कवरुन मराठी अस्मितेची हाक दिली गेली ते शिवाजी पार्क थंड, लोळागोळा होणं म्हणजे महाराष्ट्र थंड होण्यासारखं असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं. त्यामुळे शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोन मुद्यावर सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन लढण्याची गरज राऊत यांनी व्यक्त केली. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस गल्लीतला पक्ष असल्यानं त्यांना कधी शिवाजी पार्कची गरज भासत नसल्याचा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
 

First Published: Saturday, February 4, 2012, 10:10


comments powered by Disqus