टीका करताना दमानं, पवारांचा सबुरीचा सल्ला! - Marathi News 24taas.com

टीका करताना दमानं, पवारांचा सबुरीचा सल्ला!

www.24taas.com, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे विरुद्ध अजित पवार आणि आर. आर. पाटील या जुगलबंदीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभांमधून बोलताना संयम पाळावा तसंच वैयक्तिक टीका करु नये, असा सल्ला शरद पवारांनी आर. आर. पाटील आणि अजित पवारांना दिला आहे.
 
मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
 
पवारांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना संयमाचा सल्ला दिला खरा.. मात्र जेव्हा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या घोटाळ्याबाबत पवारांना छेडंलं.. तेव्हा खुद्द पवारांनाच राग आवरणं कठीण गेलं.. या सगळ्यात त्यांनी या मंत्र्यांना क्लीन चिटच देऊन टाकली.
 
निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर सुरु असलेल्या चिखलफेकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील तरुण तुर्कांना सभ्य भाषा वापरण्याची सूचना शरद पवार यांनी केली.
निवडणुकीच्या रणधुमाळीत बेरजा-वजाबाक्यांच्या, फोडाफोडीच्या राजकारणाचं प्रमाण वाढतं आहे. पण पवार यांनी प्रत्येक राजकीय पक्षाला आपली शक्ती वाढविण्याचा अधिकार आहे, असं म्हणत या राजकारणाचं समर्थनच केलं.
२०१४ सालची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा आपला विचार पक्का असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं.
 

 

First Published: Friday, February 3, 2012, 23:13


comments powered by Disqus