अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीची स्थिती - Marathi News 24taas.com

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीची स्थिती


www.24taas.com, मुंबई
 
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मुंबईत शिवसेना आणि मनसेला बंडोबांना थंड करण्यात बऱ्यापैकी यश आलं. प्रतिष्ठेच्या रवींद्र नाट्य मंदीर वॉर्ड मधून भरत राऊत आणि संजय भरणकर यांचे बंड थोपवण्यात शिवसेनेला यश आलं. मनसेच्या रश्मी विचारे आणि दीपीका निकम यांनीही माघार घेतली.
 
मात्र शिवसेनेच्या राजू काळे आणि अर्जुन नाईक आणि राजा चौगुले यांनी आपलं बंड कायम ठेवलं आहे. तर काँग्रेसच्या मीना देसाई याही रिंगणात आहेत. वॉर्ड १८३ मध्ये शिवसेनेच्या मिलिंद वैद्य यांच्या विरोधात अर्जुन नाईक यांचे बंड कायम आहे.  तर वॉर्ड ८० मध्ये भाजपच्या ज्योती अळवणी यांची बंडखोरी कायम राहीली आहे.
 
तर निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या चार नगरसेवकांचे अर्ज बाद झालेत. सुवर्णा मदाळकर, सचिन सकट, अनु चौरसिया यांचे अर्ज बाद झाले. तर रुकसाना सिद्धीरी यांनी अर्जच भरला नाही. मनसेच्या महम्मद सरोटीया यांचा अर्ज मुलांची योग्य माहिती दिली नसल्यानं बाद झाला.

First Published: Saturday, February 4, 2012, 22:26


comments powered by Disqus