Last Updated: Monday, February 6, 2012, 22:21
www.24taas.com, मुंबई 
भाजपच्या वॉर्ड क्रमांक ८० मधल्या बंडखोर ज्योती अळवणी यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी विनोद तावडेंच्या पत्नी वर्षा यांनी हजेरी लावल्यानं खळबळ उडाली आहे. वर्षा तावडे आणि ज्योती या भारतीय स्त्री शक्ती या संघटनेत एकत्र काम करतात.
तरीही भाजप बंडखोराच्या प्रचाराला वर्षा पवार तावडे यांनी हजेरी लावल्यानं खळबळ उडाली आहे. मुळात पराग आळवणी हे विनोद तावडे यांचे निकटवर्तीय मानते जातात. विद्यार्थी परिषदेपासून ते एकत्र होते. मात्र आता नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी द्यायची नाही या धोरणानुसार अळवणींच्या पत्नीला उमेदवारी नाकारण्यात आली.
मात्र त्यांनी बंड केल्यानं तिथला भाजप उमेदवार अडचणीत आला आहे. त्यातच आता बंडखोराच्या व्यासपीठावर वर्षा पवार-तावडे यांनी हजेरी लावल्यानं तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान यावर काहीही बोलण्यास विनोद तावडे यांनी नकार दर्शवला आहे. कुणाच्या व्यासपीठावर जावं, हा वर्षा तावडे यांचा अधिकार असल्याचं सांगत, त्यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
First Published: Monday, February 6, 2012, 22:21