राज ठाकरेंची सभा जांबोरी मैदानात ? - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंची सभा जांबोरी मैदानात ?

www.24taas.com, मुंबई
 
कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील सभेचा आग्रह सोडल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरेंचा महापालिका प्रचारासाठी होणारी सभा आता वरळीच्या  जांबोरी मैदानात होण्याची शक्यता आहे.
 
शिवाजी पार्कवर परवानगी न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी सेनाभवनासमोरील राम गणेश गडकरी चौकात भाषणाची परवानगी शिवाजी पार्क पोलिसांकडे मागितली होती. मात्र शिवाजी पार्क पोलिसांनी पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावली. यामध्ये कायदा तोडल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असं सांगण्यात आलं. त्यामुळे गडकरी चौकातही सभा घेण्याची शक्यता कमी झाली.
 
त्यानंतर पोर्तुगिज चर्चजवळील प्रबोधनकार ठाकरे पुतळ्याजवळ परवानगी मागितली होती. मात्र वाहतुकीचा अडथळा पाहता शिवाजी पार्क पोलिसांनी दादर पोलिसांकडे मनसेचा अर्ज पाठवला आहे. मात्र वाहतुकीची होणारी अडचण पाहता तेथेही परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता जांबोरी मैदानाचा पर्याय समोर आहे.

First Published: Tuesday, February 7, 2012, 16:29


comments powered by Disqus