राज ठाकरेंचं चुकलं कुठे? – अजित पवार - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंचं चुकलं कुठे? – अजित पवार

www.24taas.com, मुंबई
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठ राखण केली आहे. राज ठाकरे यांनी सभेसाठी शिवाजी पार्क मागितलं, तर त्यात चुकीचं काय, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. सभांसाठी मैदानं मिळालीच पाहिजेत, असं अजित पवारांनी म्हंटलं आहे. या प्रश्नाचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. निवडणूक आयोगाला तशी विनंती करू, असं अजित पवार म्हणाले आहेत.
 
राज ठाकरे यांनी सभेसाठी शिवाजी पार्कची मागणी केली होती. पण ही मागणी पालिकेने अनेकवेळा धुडकावली. त्यासाठी मनसेकडून ३५ दिवसांत ३५ वेळा मुंबई पालिकेला पत्र पाठविण्यात आली. पण पालिकेने मान्यता नाकारल्याने मनसेने मुंबई हायकोर्टात त्याविरूद्ध याचिका दाखल केली. मात्र राज ठाकरे यांच्या मागणीला हायकोर्टाने मान्यता नाकारल्याने मनसेनेची पुन्हा एकदा गोची झाली.
 
मात्र त्यामुळे राज ठाकरे यांनी तीव्र नापंसती व्यक्त केली होती. तसचं त्यांनी शिवसेनेला दसरा मेळाव्याला मैदान कसं उपलब्ध होतं? असा सवाल देखील उपस्थित केला होता. ‘जर प्रचारासाठी मैदाने मिळणार नसतील तर निवडणुका तरी का घेता’? असा हल्लाच राज ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी मैदानाची केलेली मागणी योग्य आहे. असं अजित पवारांनी देखील मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता यामागे काही नवं राजकारण तर नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.
 
 
 

First Published: Tuesday, February 7, 2012, 16:28


comments powered by Disqus