बाळासाहेबांनी कोणावर केली टीका? - Marathi News 24taas.com

बाळासाहेबांनी कोणावर केली टीका?

www.24taas.com, मुंबई
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणातील पुतणेशाहीवर ठाकरी शैलीत टोले लगावले आहेत. काकांचा जयजयकार पाहून पुतण्यांना गुदगुल्या होतात, आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात हवा जाते, अशा शब्दांत राजकारणातल्या शिरजोर आणि महात्वाकांक्षी पुतण्यांचा बाळासाहेबांनी समाचार घेतला.
 
प्रदीर्घ काळानंतर बाळासाहेबांनी पहिलीची मुलाखत दिली, तीही झी २४ तासला. संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग काल झाला. त्यात बाळासाहेबांनी राज, मनसे यांच्यावर भाष्य केलं. दोन्ही भाऊ एकत्र यावेत असं वाटतं का, पुतणेशाही, मनसेचा अजेंडा अशा अनेक प्रश्नांवर बाळासाहेबांनी आपल्या खास रोखठोक शैलीत उत्तरं दिली आहेत.
 
या खणखणीत आणि दणदणीत मुलाखतीचा दुसरा भाग आपण आज झी २४ तासवर  पाहू शकाल. पहिल्या भागाप्रमाणंच या दुसऱ्या भागाची उत्सुकताही शिगेला पोचली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या ठाकरी शैलीतील फटकेबाजी आपणास पाहता येईल झी २४ तासवर संध्या. ७.३० वा.
 
 

First Published: Tuesday, February 7, 2012, 22:37


comments powered by Disqus