Last Updated: Wednesday, February 8, 2012, 21:59
www.24taas.com, मुंबई 
मुंबई महानगरपालिका निवडणूक असली तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या निवडणूक प्रकियेत बऱ्याच प्रमाणात गुंतले आहेत. सरकार चालवणं ही कॅबिनेटची संयुक्त जबाबदारी आहे. केवळ एखादं खातं स्वत:जवळ असेल म्हणून, आपल्यामुळेच निधी आला असा दावा कुणी करत असेल, तर तो हास्यास्पद आहे.
असा टोला राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला आहे. झी २४ तासचे संपादक मंदार परब यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली रोखठोक मतं मांडली आहेत. ही विशेष मुलाखत तुम्ही आज रात्री दहा वाजता झी २४ तासवर पाहू शकता
झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अगदी मोकळ्या मनाने गप्पा मारल्या. महाराष्ट्राच्या राजकारणाशिवाय मुंबई महापालिका निवडणूक यावर काय आहेत पृथ्वीराज चव्हाण याचं मत? तुम्हांला जाणून घेता येईल. आज फक्त झी २४ तासवर.
First Published: Wednesday, February 8, 2012, 21:59