आ.अमिन पटेलांची EVM मशिनशी छेडखानी? - Marathi News 24taas.com

आ.अमिन पटेलांची EVM मशिनशी छेडखानी?

www.24taas.com, मुंबई
 
मुंबईत भायखळ्यातल्या ई वॉर्डमध्ये काल रात्री काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी जबरदस्तीने घुसून EVM मशिनशी छेडखानी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी आमदार अमिन पटेल वॉर्ड ऑफिसमध्ये शिरले.
 
आणि तिथे असलेल्या EVM मशिनमध्ये काहीतरी करीत असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. थोड्याच वेळात ही बातमी पसररातच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले. अमिन पटेल यांनी सिक्युरिटी गार्ड्सनाही मारहाण केली असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
 
दरम्यान, समाजवादी पार्टीच्या स्थानिक उमेदवारांनी पटेल यांनी EVMमशिनशी छेडछाड केल्याचा आऱोप करत निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार असल्याचं सांगितलं आहे. इथली निवडणूक रद्द करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

First Published: Friday, February 17, 2012, 21:08


comments powered by Disqus