ठाण्यात बसप तटस्थ, महापौरपदाची कोणावर भिस्त? - Marathi News 24taas.com

ठाण्यात बसप तटस्थ, महापौरपदाची कोणावर भिस्त?

www.24taas.com, ठाणे
 
ठाणे महापालिकेच्या सत्ता समीकरणात चुरस निर्माण झाली आहे. बसपाच्या दोन नगरसेवकांना तटस्थ राहण्याचा व्हिप पक्षानं बजावला आहे. या नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा देण्याचं ठरवलं होंतं. मात्र दुसरीकडं पक्षांनं त्यांना तटस्थ राहण्याचे आदेश दिले आहेत.
 
महायुती आणि आघाडी दोघांनीही ठाण्यात आपलाच महापौर होईल असा दावा केला आहे. त्यातच बसपानं बजावलेल्या व्हिपमुळं चुरस निर्माण झाली आहे. बसपाचे नगरसेवक पक्षादेश झुगारणार की पक्षाचा आदेश पाळणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
 
महायुती सत्तेचे प्रमुख दावेदार असले तरी त्यांना पूर्ण बहुमत नसल्याने इतरांची मनधरणी करणं भागच आहे. मात्र आता बसपच्या नगरसेवकांना तटस्थ राहण्याचा आदेश दिल्याने ठाण्यात महापौर कोणाचा होणार याबाबतचा तिढा आणखी वाढला आहे. तर दुसरी आघाडीही जोरदार धडक मारण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे ठाण्यात आता नक्की कोणाची सत्ता येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
 
 

First Published: Wednesday, February 29, 2012, 15:50


comments powered by Disqus