Last Updated: Tuesday, January 14, 2014, 18:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अमेरीकेच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या एका अधिकाऱ्याच्या डेबिट कार्डचं क्लोनिंग करून त्याच्या एटीएम खात्यातून तब्बल १ लाख तीस हजाराची रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना नुकतीच उघड झालीय.
अमेरिकेच्या एका मोठ्या हार्डवेअर कंपनीचे मुंबईमध्ये कार्यरत असलेले अधिकारी विकास भोसले यांच्याकडे सिटी बँकेचं डेबिट कार्ड आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांच्या डेबिट कार्डचं क्लोनिंग करून हैदराबादमधल्या एका एटीएममधून त्यांच्या खात्यातून तब्बल एक लाख तीस हजाराची रक्कम काढून घेण्यात आलीय.
भोसले यांना दोन दिवसांपूर्वी आपल्या मोबाईलवर सलग १३ एसएमएस मिळाले. हे एसएमएस होते त्यांच्या बँकेच्या खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचे... त्यांच्या खात्यातून एकूण एक लाख तीस हजारांची रक्कम वजा झाली होती. जी त्यांनी काढलेली नव्हती. ४२वर्षीय भोसले यांनी तात्काळ बँक कस्टमर केअरकडे संपर्क करून आपला कार्ड ब्लॉक करण्यास सांगितलं. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 18:09