मुंबई विमानतळावर पकडलं १.३५ कोटींचं सोनं!1.35 crore gold caught on the Mumbai airport !

मुंबई विमानतळावर पकडलं १.३५ कोटींचं सोनं!

मुंबई विमानतळावर पकडलं १.३५ कोटींचं सोनं!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गेल्या २४ तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीची तब्बल ११ प्रकरणे उजेडात आल्यानं खळबळ उडाली आहे. सुमारे १.३५ कोटींचं सोनं कस्टम विभागानं पकडलं असून, प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात तस्करी उजेडात आली.

कस्टम विभागाचे अतिरिक्त संचालक मिलिंद लांजेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत सोनं तस्करी पकडण्यात विभागाला यश आलंय. सोमवारी थाय एअरवेजच्या (फ्लाईट क्रमांक ३१७) विमानानं बँकॉक इथून एकाच विमानातून आलेल्या पाच लोकांना तस्करी करताना पकडलं. त्यांच्याजवळ प्रत्येकी ४०० ग्रॅम सोन्याची चेन आढळली.

तर, रियाध इथून जेट एअरवेजच्या विमानानं येणार्या४ एका प्रवाशानं सॉक्समध्ये सोन्याचं बिस्किट लपविल्याचं आढळून आलं. सोमवारी सुमारे ६५ लाख रुपये मूल्याचं सोनं पकडण्यात आलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 16:01


comments powered by Disqus