Last Updated: Saturday, June 29, 2013, 08:57
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई मुंबईतील बांद्रा येथे एका भरधाव कारने पाच जणांना उडविले. त्यापैकी कारच्या जोरदार धडकेत एका पोलिसाचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
बांद्रा रिक्लमेशन इथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या होंडासिटी कारने आधी एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांच्या दुचाकीला उडवलं. या अपघातात कारने पाच जणांना उडविले. यात ४ जण गंभीर जखमी झालेत.
कारच्या धडकेत सेवा बजावत असलेले हनुमंत फाळके या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. तर या अपघातात रिक्षामधील महिला आणि रिक्षाचालकही जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी २६ वर्षीय कारचालक अँड्र्यु स्टीव्हन याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, June 29, 2013, 08:57