दहाच्या नाण्याने जीव वाचला, 10 rs. coin save his life

दहा रुपयाच्या नाण्याने जीव वाचला

दहा रुपयाच्या नाण्याने जीव वाचला
www.24taas.com, मुंबई
`देव तारी त्याला कोण मारी` या उक्तीचा प्रत्यय मुंबईतल्या एका व्यक्तीला आलाय. एखाद्या सिनेमात घडावा असाच हा प्रसंग... मुंबईच्या दोन टाकी परिसरात गुरूवारी घडला. या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती लागलेत.

संजय मयेकर याला दहा रुपयांची नाणी जमा करण्याचा छंद होता. चोरट्याने गावठी कट्ट्यातून झाडलेली गोळी भिंतीवर आदळून पुन्हा मयेकर याला पाठीमागून धडकली. मयेकर याच्या पॅण्टच्या मागील खिशात दहाची नाणी असल्याने गोळी चाटून गेली.

या हल्ल्यात जखमी झालेल्या मयेकर यांना उपचारासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलय. मयेकर यांचं दैव बलवत्तर म्हणूनच खिशातल्या 10 रूपयांच्या नाण्याने त्यांचे प्राण वाचले. या हल्ल्यातील हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. जेजे मार्ग पोलीस आणि क्राईम ब्रांच युनीट 2 मार्फत या गोळीबार प्रकरणाचा तपास सुरूय.

First Published: Friday, October 19, 2012, 14:43


comments powered by Disqus