शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकासाठी १०० कोटी, 100 crore for the provision of Shivaji

शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद

शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाने हा एक बंपर धमाका केलाय. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस झालाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आलीय. गिरगाव चौपाटीपासून साडे किलोमीटरवर अरबी समुद्रात १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आलीय.

अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हे स्मारक लवकरच मार्गी लागेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी राज्य सरकारच्यावतीने जागा निश्चित करण्यात आली आहे. हे स्मारक जवळपास १५ .९६ हेक्टर जागेत होणार आहे. ही जागा राजभवनापासून समुद्रामध्ये १.२ किलोमीटर लांब आहे. हेच अंतर गिरगाव चौपाटी पासून तीन किलोमिटर तर नरिमन पॉईंट पासून २.६ किमी एवढे आहे. स्मारकाच्या जागेवर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, मेरीटाईम बोर्ड आणि आयआयटी पवई यांनी अन्वेषण आणि सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 20:04


comments powered by Disqus