Last Updated: Sunday, March 16, 2014, 15:34
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई नवी मुंबईमधील रबाळे परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आलीय. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडलीय.
सदर घटनेतील आरोपी नूर मोहम्मद यांने त्याच्याच परिसरातील १४ वर्ष मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर सप्टेंबर २०१३ रोजी बलात्कार केलाचे उघड झालंय.
मोहम्मद पीडित मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवत असे. सदर मुलगी गरोदर असून, तिला मुंबईमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
सदर आरोपी फरार झाला असून, तो त्याच्या मूळ गावी लग्नासाठी गेल्याचं बोललं जातंय. त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नूरचा तपास करीत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, March 16, 2014, 15:34