Last Updated: Monday, October 1, 2012, 15:31
www.24taas.com, मुंबई मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. येत्या १५ तारखेपासून मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल धावणार आहे. महिलांसाठी ही खूशखबर दुप्पट आनंद देणारी गोष्ट म्हणजे, वाढीव तीन डब्यांपैकी दोन डबे महिलांसाठी राखीव असणार आहेत. १५ डब्यांच्या लोकलच्या दिवसातून १४ फेऱ्या मध्यमार्गावर होणार आहेत.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण ही १५ डब्यांची सेवा सुरू करण्यात आलीय. दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली कल्याण अशा रेल्वे स्थानकांवर या लोकलच्या दिवसाला १४ फेऱ्या होतील, असं वेळापत्रक तयार करण्यात आलंय. १५ ऑक्टोबरपासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
First Published: Monday, October 1, 2012, 15:31