१५ वर्षाच्या मुलीवर वर्षभर बलात्कार, बापाला अटक, 15 year old girl rape, father arrested

१५ वर्षाच्या मुलीवर वर्षभर बलात्कार, बापाला अटक

१५ वर्षाच्या मुलीवर वर्षभर बलात्कार, बापाला अटक
www.24taas.com, मुंबई

महिला, तरूणी, अल्पवयीन मुली यांच्यावर होणाऱ्या दिवसेंदिवस अत्याचार वाढतच चालले आहेत. बाहेर मुलींची छेड काढणे बलात्कार यासारख्या घटना सरार्स घडतात. त्यातच भर म्हणून मुंबईत वडील-मुलीच्‍या नात्‍याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्‍या १५ वर्षाच्‍या मुलीवर बापानेच गेल्‍या वर्षभरापासून बलात्‍कार केल्याचे समोर आले आहे.

मुंबई पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पीडित अल्‍पवयीन मुलीने तिच्‍या शेजाऱ्यांच्‍या मदतीने विक्रोळी पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवली. आरोपीस सात फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्‍यात आली आहे. आरोपी गेल्‍या एक वर्षांपासून आपल्‍या अल्‍पवयीन मुलीवर बलात्कार करीत होता. आणि कोणाला सांगितल्यास जिवे मारण्‍याची धमकी देत होता.

आपल्‍यावरील अत्‍याचाराची माहिती तिने आईला ही सांगितली होती. मात्र, तिच्‍यावर कोणीच विश्‍वास ठेवला नव्‍हता. शेवटी पीडित मुलीने शेजाऱ्यांची मदत घेऊन आपल्‍या वडीलांवर पोलिसांत गुन्‍हा नोंदवला.

First Published: Tuesday, February 5, 2013, 16:19


comments powered by Disqus