गॅसच्या बहाण्यानं घरात शिरून विवाहितेवर बलात्कार, 2 gas delivery men rape city housewife

गॅसच्या बहाण्यानं घरात शिरून नवविवाहितेवर बलात्कार

गॅसच्या बहाण्यानं घरात शिरून नवविवाहितेवर बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अंधेरीत एका नवविवाहीत १९ वर्षीय तरुणीवर दोन गॅस डिलिव्हरी करणाऱ्या गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांनी बलात्कार केल्याची घटना घडलीय. तक्रारीनंतर पोलिसांनी या दोन नराधमांना अटक केलीय. पण, या घटनेनं संपूर्ण परिसरच हादरून गेलाय.

अंधेरी पूर्वेकडील जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक परिसरातील ही घटना... केवळ पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेली `ती` यावेळी घरात एकटीच होती. दोन दिवसांपूर्वी तिच्या घरी गॅस सिलिंडर पोहचवण्यात आलं होतं. पण, सिलिंडर पोहचवून दोन दिवस उलटल्यानंतर `ते` दोघे पुन्हा तिच्या घरी पोहचले आणि त्यांनी तिच्याकडे सिलिंडर डिलिव्हरी पावतीची मागणी केली. ती पावती आणण्यासाठी आत जाऊ लागली तेव्हाच तिच्यामागून धाडकन दरवाजा बंद झाला... ते दोघे एव्हाना घरात शिरले होते... यावेळी ती प्रचंड घाबरली. तिनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण, तिनं आरडाओरडा करू नये, विरोध करू नये एकानं तिचा गळा दाबून धरला आणि दुसऱ्यानं तिच्यावर बलात्कार केला. `ती` बेशुद्ध पडल्याचं पाहून या दोघांनी घरातील पैशांवर आणि सोन्यावरही हात मारला.

पीडित तरुणीला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. तिनं मोठ्या हिंमतीनं एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांची कारवाई
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं जवळच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तेव्हा, घटनेच्या दोन दिवसांपूर्वी मोहम्मद शेख (३५) आणि चंदन जैसवाल (२७) हे दोघे पीडित महिलेच्या इमारतीत गॅस सिलिंडर पोहोचविण्यासाठी गेल्याचं उघड झालं. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या दोघांनीही आपल्या कृत्याची कबुली दिलीय, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 31, 2014, 10:11


comments powered by Disqus