Last Updated: Saturday, January 11, 2014, 08:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईतील ओशिवरा भागातली शासकीय अधिका-याची बहुचर्चित इमारत मीरा टॉवर पुन्हा एकदा वादात सापडलीय. या इमारतीत बेस्ट महाव्यवस्थापक ओ पी गुप्ता यांच्या घरात तब्बल दोन लाख रुपयांच्या अश्लील चित्रपटांच्या सीडी आणि डीव्हीडी जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी तीन पुरूष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलंय. ओ पी गुप्ता यांनी त्यांचं घर मुखर्जी नावाच्या व्यक्तीला भाड्यानं दिलं होतं. यापूर्वीही या इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश झाला होता. या ठिकाणी अनेक आयपीएस आणि आयएएस अधिका-यांची घरे आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 10, 2014, 12:35