Last Updated: Monday, December 16, 2013, 22:37
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईनवी मुंबईतल्या संध्या सिंह हत्याप्रकरणी पहिली अटक झालीय. संध्याचा मुलगा रघुवीर सिंग पोलिसांना शरण येताच त्याला अटक करण्यात आलीय.
संध्या सिंग हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच तिचा २४ वर्षांचा मुलगा रघुवीर सिंग याच्यावर
संशय होता. पन्नास वर्षांच्या संध्या सिंग १३ डिसेंबर २०१२ला बेपत्ता झाली होती. २८ जानेवारी २०१३ला तिच्या हाडांचा सापळा घराजवळच सापडला होता.
पोलिसांच्या चौकशीत रघुवीर सिंगचं नाव पुढे आलं. संध्या सिंग ज्या दिवशी बेपत्ता झाली होती, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यानं घरातच मित्रांना पार्टी दिली होती.
पैशांवरुन संध्या सिंग आणि तिचा मुलगा रघुवीरची सतत भांडणंही व्हायची. अखेर वर्षभरानंतर रघुवीर सिंग पोलिसांना शरण आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. पाहा व्हिडिओ
First Published: Monday, December 16, 2013, 22:05