अबब... २०४ किलो तस्करीचे सोनं केलं जप्त, 204 kg gold seized from mumbai airport

अबब... २०४ किलो तस्करीचे सोनं केलं जप्त

अबब... २०४ किलो तस्करीचे सोनं केलं जप्त

www.24taas.com, अजित मांढरे, झी मीडीया, मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात सोन्याच्या तस्करीत लक्षणीय वाढ झालीये. सोन्यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्स वाढीमुळे ही तस्करी वाढल्या़चं बोलंल जातय. पण, सोने तस्करीची आकडेवारी लक्षात घेता रोज़ किमान ५० लाख रुपयांचं सोनं तस्करांकडून जप्त केलं जातं. आतापर्यंत सगळ्यात जास्त सोन्याची तस्करी अस्लयाचं बोलंल जातय.


- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी
दिवसाला ५० लाख रुपयांचं सोनं तस्करांकडून केलं जातं जप्त
- ११० टक्क्यांनी वाढली सोन्याची तस्करी
- एवढ्या मोठ्याप्रमाणात केल्या जाणा-या तस्करीमुळे विमानतळ प्रशासन ही हैराण


मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज जवळपास ५० लाख रुपयांचं सोनं तस्करांकडून जप्त केलं जातं. गेल्या जानेवारी महिन्यात तर तब्बल ७९ किलो सोनं या आंतरराष्ट्रीय विमामतळावर तस्करांकडून जप्त करण्यात आलय. साधारण १९८० ते १९९५ च्या काळात करीम लाला, वर्धराजन, दाऊद आणि छोटा राजन समुद्रामार्गे मोठ्याप्रमाणात सोन्याची तस्करी केली जायची. पण, काही काळानंतर समुद्रामार्गे सोन्याची तस्करी जवळपास बंद झालीये. कारण तस्करांनी आता विमानामार्गे सोन्याची तस्करी सुरु केलीये.
याच मुख्य कारण आंतरराष्ट्रीय सोने तस्कारांशी झालेली जवळीक. आणि त्याही पेक्षा महत्वाचं कारण म्हणजे सोन्यावरील कर. आर्थिक तुट भरुन काढण्यासाठी सोन्याची आयात कमी करण्याचा मार्ग काढला गेला. आणि त्यामुळे सोने आयातीवरील कर गेल्या काही वर्षात २ टक्क्यावरुन १० टक्क्यांवर केलाय. तर १०० किलो आयात केलेल्या सोन्यातील २० किलो सोने निर्यात करणं कायद्यानं बंधनकारक करण्यात आलं. आणि जर ते २० किलो सोनं निर्यात नाही केलं तर सोनं आयातीचा परवाना रद्द केला जातो. त्यामुळे कायदेशीर सोन्याची तस्करी कमी झाली.

सोन्याची तस्करीची गेल्या काही वर्षांची आकड़ेवारी लक्षात घेता ही सोन्याची तस्करी ११० टक्क्यांनी वाढलीये. २०११- २०१२ साली ३० किलो पेक्षा कमी सोनं तस्करांकडून जप्त करण्यात आलय. तर २०१२ - २०१३ साली ५४ किलो सोन्यासह ३० तस्करांना अटक करण्यात आलीये. पण, २०१३-२०१४ मध्ये अटक केलेल्या ९० तस्करांकडून तब्बल २०४ किलो सोने कस्टम विभागानं हस्तगत केलय.

कशी होते तस्करी
जग बदलय तसं सोन्याची तस्करी करण्याच्या पद्धतीही बदलेली आहे. मोबाईलची बॅटरी ठिकाणी सोन्याचे बिस्कीट तस्कर केले जाते, चप्पल किंवा बूटाच्या पोकळीत सोन्याची बीस्कीटांची तस्करी केली जाते, तर एक नवीन प्रकार म्हणजे सुटकेसच्या कडेला असलेली स्टीलच्या कड़ी ऐवजी चंदेरी प्लेटींग केलेली सोन्याची कड लावून सोन्याची तस्करी केली जाते.
ही तस्करी वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे कमी शिक्षेची तरतूद आणि शुल्लक दंड असंही बोलंल जातं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 18, 2014, 18:34


comments powered by Disqus