24taas.com- CST attackers in CCTV

सीएसटीचे दंगेखोर सीसीटीव्हीत कैद

सीएसटीचे दंगेखोर सीसीटीव्हीत कैद
www.24taas.com, मुंबई

गेल्या आठवड्यात मुंबईतल्या सीएसटी परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनातील दंगलखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत. हातात बंदुका घेऊन धुडगूस घालणारे काही तरुण सीसीटीव्हीत कैद झाल्याने दंगेखोरांचा पर्दाफाश झालाय.

आता हे दंगेखोर नेमके कोण आहेत, याचा एसआयटीचे अधिकारी शोध घेत आहेत. आझाद मैदानाजवळ झालेल्या आंदोलनात आंदोलकांमधील एका गटाने पोलिसांवर अचानक बेछूट गोळीबार सुरू केल्याचं पोलिसांचं म्हणणंय. याच गटातील एकजण हातात एसएलआर बंदुक घेऊन धुडगूस घालत असल्याचं उघड झालंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा दंगेखोर कैद झाला असून त्याचा एसआयटीकडून शोध घेण्याचं काम सुरू झालंय.

सीएसटीवरील या हिंसाचारात 2 जणांचा मृत्यू झाला. तर 63 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये 58 पोलिसांचा समावेश आहे. मरण पावलेल्या दोघांचाही गोळी लागून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, हा मृत्यू दंगेखोरांच्या गोळीने झाला, की पोलिसांच्या हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.

First Published: Thursday, August 16, 2012, 11:19


comments powered by Disqus