Last Updated: Sunday, August 12, 2012, 06:41
www.24taas.com, मुंबईमुंबईतल्या सीएसटी परिसरात हिंसक जमावानं घातलेल्या गोंधळात 2 ठार तर 47 जण जखमी झालेत. मुंबईत पुन्हा एकदा अशांतता. पुन्हा एकदा हिंसक जमावाकडून धुडगूस.
आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसेचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत जवळपास पन्नास हजार नागरिक सहभागी झाले होते. मात्र अचानक हा जमाव हिंसक झाला. जमावानं न्यूज चॅनेल्सच्या ओबी व्हॅन्स आणि पोलिसांना टार्गेट केलं. तोडफोड करत त्यांनी ओबी व्हॅन्सला पेटवून दिलं. या हिंसक जमावाच्या तोडफोडीचा फटका बेस्टच्या बसेसनाही बसला. जवळपास 25 बसेसचं यांत नुकसान झालं.घटनेनंतर मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात आलाय.
दरम्यान सीएसटी परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलंय.. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येतोय. या गोंधळात जखमी झालेल्या व्यक्तींवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. हिंसक आंदोलनानंतर सीएसटीवरील हिंसक परिस्थितीही नियंत्रणात आहे.. मात्र हा हिंसाचार उत्स्फूर्त होता की नियोजित याच्या चर्चा सुरु झाल्यात.. शिवाय सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोरील आव्हानही कडवं बनलंय.
First Published: Sunday, August 12, 2012, 06:41