24taas.com नंबर , 24taas.com NO 1

24taas.com नंबर 1

<b><font color=red>24taas.com नंबर 1</b></font>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या 24taas.com ला जगभरातील नेटिझन्सने डोक्यावर धरले आहे. लोकसभेच्या प्रत्येक क्षणाची अपडेट देण्यात झी २४ तासची वेबसाइट 24taas.com इतर चॅनलच्या वेबसाइटपेक्षा आघाडीवर होती.

24taas.com ला लोकसभेच्या मतमोजणीच्या दिवशी २६ लाख १२ हजार १४९ नेटिझन्सने भेट दिली.

याच दिवशी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वेबसाइटला २३ लाख ६०० हिट्स असल्याचे त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर दिले आहे. झी २४ तासच्या वेबसाइटला एका व्यक्तीने सुमारे साडे अकरा मिनिटे भेट दिली. या काळात सुमारे ३ लाख नवे नेटिझन्सने पहिल्यांदा झी २४ तासच्या साइटला भेट दिली आहे.

जगभरातून लोकसभेच्या निकालाची उत्सुकता असलेल्या मराठी नेटिझन्सने भारतानंतर इंडोनेशियातून सर्वाधिक हिट्स दिल्या. त्यानंतर अमेरिकेतील मराठी माणसांचा नंबर लागतो.

भारतातील शहरामधील नेटिझन्सचा विचार करता, मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती दर्शविली. त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बंगळुरूचा क्रमांक चौथा लागतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 22, 2014, 15:35


comments powered by Disqus